विरार आगप्रकरणी रेल्वे प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

विरार आगप्रकरणी रेल्वे प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

Published on

विरार, ता. ८ (बातमीदार) : प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या पाठपुराव्याअंती विरार ईएमयू कारशेड येथील शेकडो वृक्षांची हानी झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या भारतीय रेल्वे प्रशासनाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई-विरार रेल्वे प्रशासनाविरोधात पर्यावरणाच्या ऱ्हासाविरोधात दाखल केलेला हा पहिलाच गुन्हा आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी वसई-विरार महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग आणि अग्निशमन विभागाची परवानगी न घेता ७ मार्च रोजी विरार ईएमयू कारशेड येथे लावलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडे नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास झाला होता. आगीचे हे लोण मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करावे लागले. या आगीचे स्वरूप एवढे भयंकर होते की, विरार येथून अगदी नालासोपारा निळेमोरेपर्यंत जवळपास दोन किमीपर्यंत या आगीचे लोण पसरले. ही आग रेल्वे रुळाजवळील रहिवासी इमारतीपर्यंत पोहोचली. या आगीमध्ये जवळपास १०० झाडे जळून नष्ट झाली होती. काही झाडे ही कटरच्या साह्याने कापून नंतर ती जाळून टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत होते. त्याचबरोबर अनेक विद्युत उपकरणे, विजेच्या तारा, सीसीटीव्ही केबल वायर, विजेचे खांब आदी साहित्य जळून खाक झाले. ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास येताच पालघर जिल्हाध्यक्ष ठाणे संपर्कप्रमुख हितेश जाधव यांनी राज्य सरकार, केंद्रीय रेल्वे प्रशासन आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि वसई विरार महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. अखेर भारतीय रेल्वे प्रशासनाविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com