पान३ पट्टा

पान३ पट्टा

Published on

क्रीडांगणाच्या दुरवस्थेने रहिवासी नाराज
नेरूळ (बातमीदार)ः नेरूळ सेक्टर ६ परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रीडांगण आहे. या मैदानावर बाराही महिने बकालपणा असतो. या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. स्थानिक रहिवाशांसाठी एकमेव मैदान आहे. यामुळे मैदान, उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानातील समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई पालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने स्थानिकांनी पालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच समस्यांचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.
़़ः---------------------------------
रस्ते दुरुस्तीचा वाशीकरांना मनस्ताप
जुईनगर (बातमीदार): वाशी सेक्टर १५ येथील मराठा भवन परिसरात पालिकेच्या कामांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य वाढले असून वाहन चालकांना देखील प्रचंड मनस्ताप वाढला आहे. या परिसरात भाजी आणि फळ बाजार, मराठा भवन सभागृहामुळे परिसर गजबजलेला असतो. त्यामुळे येथील कामे लवकर मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा खोदलेले खड्डे, दोन ठिकाणी दक्षिण उत्तर खोदलेला रस्ता, खड्ड्यांमधून निघालेल्या मातीचे ढिगारे, उघडी गटाराची झाकणे डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणा मलनिःसारण, पाणी, इतर वाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
ः------------------------------
ऑपरेशन सिंदूर पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई (वार्ताहर): सावरकर विचार मंचतर्फे ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित ऑपरेशन सिंदूर (बदलता भारत -संयमातून सडेतोड उत्तराकडे) या पुस्तकाचे प्रकाशन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी वाशीत होणार आहे. वाशी येथील गुजरात भवन सभागृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या पुस्तकात भारताने पाकिस्ताविरुद्ध स्वीकारलेली मल्टी डोमेन स्ट्रॅटेजी सविस्तरपणे उलगडलेली आहे. सायबर हल्ले, माहिती प्रवाहाचे नियंत्रण आणि सॅटेलाइट इंटेलिजन्स या सर्व क्षेत्रात तांत्रिक प्रभुत्व पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे. सिंधु पाणी कराराचा फेरविचार, आत्मनिर्भर भारताचे शस्त्रसामर्थ्य, भविष्यातील धोके गोष्टींचे सखोल विश्लेषण पुस्तकात लेखकाने केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
़़़़़़़़़़़़़ः---------------------------------
बेवारस वाहनावर पालिकेची कारवाई
तुर्भे (बातमीदार): नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात दररोज रस्त्यावर, पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यावर थेट कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर, पदपथावर बेवारसपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने रस्त्यावर अनेक दिवसांपासून उभ्या असणाऱ्या वाहनांना नोटीसा चिकटवल्या जात आहेत. या नोटिसांची मुदत संपल्यावर उचलून नेण्याची कारवाई केली जात आहे. ठराविक वेळेनंतर गाड्या लिलाव करून विकल्या जाणार असल्याची कारवाई केली जाणार आहे. नवी मुंबई पालिकेच्यावतीने शहरात सर्वत्र अतिक्रमण हटवण्याची कारवाई सध्या वेगाने सुरू आहे. शहरातील फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर थेट कारवाई केली जात आहे.
़़़़़ः-------------------------------
सीवूडच्या पाळणाघरासाठी आंदोलनाचा इशारा
नेरूळ(बातमीदार)ः सीवूड सेक्टर ४८ मध्ये अनेक वर्षांपासून बनून तयार असलेली पाळणा घराची इमारत वापरावीणा धुळखात पडून आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे ५ ते ७ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. मनसेच्या सरचिटणीस शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यावेळी पाळणाघर सुरू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, अजूनही पाळणाघर सुरू केलेले नाही. त्यावर सोमवारी अमोल आयवळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांना पत्र देत दोन दिवसांत पाळणाघर सुरू झाले नाहीतर आयुक्तांच्या दालनात पाळणा हलवत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सचिन कदम, राजू खाडे, अखिल खरात, मंगेश काळेबाग, भरत माने, प्रद्युमन हेगडे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com