डोंबिवली एमआयडीसीत केबल चोरीचे सत्र कायम
डोंबिवली एमआयडीसीत केबल चोरीचे सत्र
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : एमआयडीसी निवासी भागातील नाले-गटार व भूमिगत सांडपाणी मार्गांच्या कामादरम्यान उघड्यावर पडणाऱ्या बीएसएनएलच्या जुना-नव्या केबल चोरीच्या घटना वाढत आहेत. रविवारी (ता. ७) वीजपुरवठा खंडित झाला होता. या वेळी काळोखाचा फायदा घेत मिलापनगर परिसरात पुन्हा एकदा केबल कट करून नेण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या मदतीने उधळला गेला.
स्थानिक रहिवासी फुलाजी गायकर यांनी बंगलो प्लॉट आर एल - १२८ समोर गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यातून केबल कापून नेत असलेल्या दोघांना रंगेहाथ पकडले. ‘आम्ही टेलिफोन कंपनीचे कर्मचारी आहोत’ असे सांगून ते पळून गेले. तीन मोठी बंडल तिथेच टाकून चोर पळाल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच समाजसेवक राजू मलावडे यांनी बीएसएनएलला फोटोसह कळवले; मात्र रविवारी सुट्टीमुळे कर्मचारी उपलब्ध न झाल्याचे सांगण्यात आले.
मानपाडा पोलिस रात्री घटनास्थळी पोहोचले आणि तीन बंडलपैकी एक सुरक्षित ठेवण्यात आले; मात्र उरलेले दोन बंडल चोरट्यांनी रात्रीतून पुन्हा लंपास केले. सोमवारी बीएसएनएल अधिकाऱ्यांनी तपासणी करून केबल त्यांच्याच मालकीची असल्याची पुष्टी दिली असून, लवकरच अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल होणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले. याआधीही २३ नोव्हेंबरला आर एक्स -०१ साईश्रुष्टी सोसायटीसमोर अशीच केबल चोरी झाली होती. रहिवासी राजेश कोलापाटे यांनी तेव्हा चोरांचा फोटो घेतला होता; मात्र बीएसएनएलकडून आवश्यक ती कारवाई न झाल्याने चोरीचे प्रकार चालूच असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

