मुंबई
संविधान उद्देशिकेची फ्रेम अधिकाऱ्यांना भेट
संविधान उद्देशिकेची फ्रेम अधिकाऱ्यांना भेट
वांद्रे, ता. ८ (बातमीदार) ः वांद्रेकर परिवार व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून “संविधान उद्देशिकेची फोटो फ्रेम” सोमवारी निर्मलनगर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस निरीक्षक सुरेखा घार्गे यांना भेट देण्यात आली. त्यांनी ही फ्रेम स्वीकारत उपक्रमाचे कौतुक केले. वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, पोलिस ठाणे, शासकीय कार्यालये, रेशनिंग ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय येथेही संविधान उद्देशिकेची फ्रेम भेटस्वरूपात देण्यात येणार आहे.

