अत्याधुनिक तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : वैद्यकीय मदत उशिरा मिळाल्याने होणारी जीवितहानी टाळण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, म्हणून मार्श मॅक्लेन संस्थेच्या बिलियन हार्ट्स बीटिंग फाउंडेशनने अपोलो हॉस्पिटलला तीन अत्याधुनिक रुग्णवाहिका दिल्या आहेत.
या रुग्णवाहिकांचे सोमवारी बेलापूर येथे लोकार्पण करण्यात आले. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा गंभीर अपघातांसारख्या आणीबाणीच्या प्रसंगी मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिकांमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांपर्यंत पोहोचण्याची क्षमता प्रचंड वाढणार आहे. तसेच गरजुपर्यंत मदत किती वेगाने पोहोचते, यात खरे यश असल्याचे अपोलो हॉस्पिटलचे पश्चिम विभागाचे सीईओ अरुनेश पुनेथा यांनी सांगितले, तर या उपक्रमामुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद, सक्षम आणि सर्वांसाठी सुलभ होईल, असे मार्श मॅक्लेननचे सीईओ संजय केडिया म्हणाले.

