मोरा ते मुंबई रोरोने प्रवास
मोरा ते मुंबई रोरोने प्रवास
एप्रिल २०२६ मध्ये सेवा सुरू होण्याचे संकेत
उरण, ता. ८ (वार्ताहर)ः उरणला जलमार्गाने जोडणाऱ्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का रो-रो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजू झपाटे यांनी दिली आहे.
उरणच्या मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का)दरम्यानची रो-रो सेवा रखडली आहे. सागरमाला योजनेतूनच हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी ८८ कोटी ७२ लाखांचा आराखडा बनवण्यात आला होता, मात्र ७३ कोटींचा निधी प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला. त्यामुळे वर्षभरापासून जेट्टीचे काम बंद होते, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून कामाला गती आली असून, एप्रिल २०२६ अखेरपर्यंत रो-रोचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा मेरिटाइम बोर्डाने केला आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांसाठी खासगी वाहनांसह मुंबईत जाण्यासाठीचा नवा पर्याय मिळणार आहे.
----------------------------
खर्च ः ७३ कोटी
कामाची सद्यःस्थिती - ५० टक्के पूर्ण

