९३५ रुपयांत थेट मुंबईत

९३५ रुपयांत थेट मुंबईत

Published on

९३५ रुपयांत थेट मुंबईत
नेरूळ जेट्टीवरून १५ डिसेंबरपासून प्रवासी सेवा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.८ : सिडकोच्या नेरुळ जेट्टीहून अनेक वर्षांपासून रखडलेली प्रवासी सेवा १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे नेरुळ ते भाऊचा धक्का हा प्रवास अवघ्या अर्धातासात होणार असून त्यासाठी ९३५ रुपये मोजावे लागणार आहेत.
सिडकोने पामबीच मार्गालगत नेरुळ येथे जेट्टी तयार केली आहे. या जेट्टीहून रोरो सेवा सुरु करण्याचा सिडकोचा मानस होता. मात्र, या मार्गावरील सेवा तांत्रिक अडचणींमुळे सुरु झाली नव्हती. जेट्टी तयार होऊन अनेक वर्षांपासून चालवण्यासाठी कंपनी मिळत नसल्याने ही सेवा धुळखात पडून होती. अखेर दृष्टी लाईफ सेलिंग कंपनीने ऑक्टोबरपासून सेवा सुरू केली आहे. सध्या नेरुळ ते घारापुरी बेटा दरम्यान जलवाहतूक सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी एक अशा दोन फेऱ्या सुरु आहेत. यासाठी प्रतिव्यक्ती ५६० रुपये एवढा तिकीट दर आकारला जात आहे. तर नेरुळ ते भाऊचा धक्का या जलमार्गावर प्रवासी बोट सुरु करण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे परवानगी प्रतिक्षेत आहे. आठवडाभरात त्याला प्रतिसाद मिळाला तर सोमवारपासून प्रवासी सेवा सुरु करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासनाकडून सुरु आहे.
-----------------------------------
घारापुरी सेवेला अल्प प्रतिसाद
सिडकोने बांधलेल्या नेरुळ जेटीवरून सध्या घारापुरी (एलिफंटा) बेट अशी सेवा सुरु आहे. सकाळी सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता अशा प्रत्येकी एक फेरी चालवली जाते. प्रवाशांना बोटीने घेऊन नंतर पुन्हा तीन तासाने परत आणून जेटीवर सोडले जाते. या प्रवासाकरीता ५६० प्रति व्यक्ती इतके तिकीट मोजावे लागत आहे. एका बोटीत दहा प्रवासी बसू शकतात.
---------------------------------
९३५ रुपये मोजा
नेरुळ ते भाऊचा धक्का या जलसेवे दरम्यान २० सीटची फेरीबोट सुरु करणार आहे. त्याकरीता ९३५ रुपये तिकीट असणार आहे. दिवसभरात सकाळ आणि संध्याकाळी अशा चार फेऱ्या होणार आहे. ३० मिनिटामध्ये भाऊचा धक्का पोहोचता येणार आहे. मेरीटाईम बोर्डाकडून जलवाहतूकीची परवानगी शिल्लक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर सेवा सुरु होणार आहे.
--------------------------------
फ्लेमिंगो टुरिजम
नेरूळ जेटीवर सिडकोतर्फे लवकरच फ्लेमिंगो आणि कांदळवन टुरिजम सुरु केले जाणार आहे. फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आणि इतर पर्यटकांसाठी खास बस द्वारे नवी मुंबईतील एनआरआय तलाव, चाणक्य तलाव येथे येणारे फ्लेमिंगो दाखवले जाणार आहे. नंतर पुन्हा जेटीवर सोडून मुंबईत पठवले जाईल. त्याकरीता ३ हजार रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com