एस व्ही सी सहकारी बँकेची एस व्ही सी नेक्स्ट सुविधा

एस व्ही सी सहकारी बँकेची एस व्ही सी नेक्स्ट सुविधा

Published on

एसव्हीसी सहकारी बँकेची एसव्हीसी नेक्स्ट सुविधा
मुंबई, ता. ८ : बहुराज्य शेड्युल बँक असलेल्या एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगमध्ये अनेक नवी वैशिष्ट्ये सादर करून ही यंत्रणा व्यवस्थित करण्यात आली आहे.
या एसव्हीसी नेक्स्ट सुविधेद्वारे ग्राहकांचे डिजिटल बँकिंग व्यवहार सोपे आणि सुरक्षित होतील. बायोमेट्रिक लॉगिन, फेस रेकग्निशन आदींच्या साह्याने वापरकर्ते आपल्या बोटांचे ठसे किंवा चेहऱ्याची ओळख वापरून पासवर्डमुक्त प्रवेश करू शकतील. यामुळे पटकन यंत्रणेत प्रवेश मिळतो आणि किचकट पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. सेल्फ ऑनबोर्डिंगमध्ये मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसाठी त्वरित नोंदणी करता येते. पे टू कॉन्टॅक्टसनुसार निधी हस्तांतरण सुलभ होते. रिझर्व्ह अँड शेड्युल फंड या वैशिष्ट्यामुळे आगाऊ पेमेंटसाठी निधी बाजूला ठेवण्याची व्यवस्था होते. त्यामुळे महत्त्वाच्या पेमेंटसाठी तारखा चुकत नाहीत. यामुळे ग्राहकांना व्यवहार करणे अत्यंत सुलभ होईल, असे बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर म्हणाले. या नवकल्पनांद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण होईल, अशी माहिती बँकेचे एमडी रवींदर सिंह यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com