दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

Published on

उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद एवढा वाढला आहे की पालक लहान मुलांना बाहेर खेळायला सोडायलाही घाबरू लागले आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील सम्राट अशोक नगर परिसरात रेणुका आशीर्वाद सोसायटी आणि आसपासच्या भागात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शाळा, बालवाड्या आणि उद्यानांच्या आसपास दिवसरात्र कुत्र्यांची गर्दी पाहायला मिळते. अशोकनगरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालिकेवर अचानक एका भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिच्या चेहऱ्यावर चावा घेतला. क्षणभरात परिसरात आरडाओरड उडाली. नागरिकांनी तत्काळ धाव घेत बालिकेला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि तिला उल्हासनगर शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर बालिकेच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधून तातडीची कारवाईची मागणी केली. पालिकेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी येऊन हल्ला करणाऱ्या कुत्र्याला पकडून डॉग सेंटरमध्ये दाखल केले आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कारवाई पुरतेच समाधान न मानता परिसरातील इतर सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बंधन व लसीकरण मोहीम होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यावरही प्रशासनाने निष्क्रिय राहणे धोकादायक आहे. आम्ही अनेक वेळा भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी दिल्या; पण आजवर ठोस कारवाई झाली नाही. नागरिकांना भीतीच्या छायेत जगावे लागू नये म्हणून तातडीने रेबीजविरोधी लसीकरण मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे. महापालिकेने आजच पावले उचलली नाही, तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- शिवाजी रगडे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com