आयआयटी मुंबई मध्ये भारतातील  इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी लाँच

आयआयटी मुंबई मध्ये भारतातील इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी लाँच

Published on

नवउद्योजकांना बळ
आयआयटी मुंबईमध्ये इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी लॉन्च


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मुंबईने पाऊल उचलले आहे. त्यानुसार आयआयटी मुंबईतील सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (एसआयएनई) यांनी आज ‘वाय-पॉइंट वेंचर कॅपिटल फंड’ या देशातील पहिल्या डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंडची घोषणा केली. या माध्यमातून आयआयटी मुंबईत इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी लॉन्च करण्यात आले असून, यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून २५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा सर्व निधी इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसीसाठी वापरला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून आयआयटी मुंबईत पहिल्यांदाच देशातील डीप टेक स्टार्टअप्सच्या वाटचालीत बदल करण्यासाठी एक मोठा पर्याय मिळणार आहे.

मागील दोन दशकांहून अधिक काळ एसआयएनईच्या माध्यमातून तंत्रज्ञान नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध स्तरावरील संशोधनाचे रुपांतर व्यावसायिक उद्योगांमध्ये केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ५०० हून अधिक स्टार्टअप्स व १००० हून अधिक नवोन्मेषकांना सहकार्य मिळाल्यामुळे, डीप टेक स्टार्टअप्सना येणाऱ्या विशिष्ट अडचणी, लॅब ते मार्केट आदी विषयातील सोडवणूक करणे सोपे होणार आहे.
आयटी मुंबईला मिळालेल्या २५० कोटींच्या या निधीला सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चीही मान्यता मिळाली आहे. हा निधी मूलभूत संशोधनावर आधारित उत्पादने उद्योग व्यवसायासाठी वापरला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रगत संगणन, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, अणू तंत्रज्ञान, अवकाश आणि संरक्षण तंत्रज्ञान, हवामान आणि क्लीनटेक तसेच लाइफ सायन्सेस आणि आरोग्यसेवा आदींसाठी तो खर्च केला जाणार आहे.
यामुळे देशातील इतर अग्रगण्य संस्थांमधील जागतिक दर्जाचे कौशल्य, शैक्षणिक ज्ञान आणि अत्याधुनिक संशोधन यांच्या आधारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्टार्टअप्स तयार करण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले.


बौद्धिक संपदा (आयपी) आणि समाजावर मोठा प्रभाव असलेल्या डीप टेक उपक्रमांना सहकार्य करून आरोग्यसेवा, शाश्वतता आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांतील महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नवीन शोधांना चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.
- प्रा. मिलिंद अत्रे, उपसंचालक, एआरटी, आयआयटी मुंबई


हा फंड आयआयटी मुंबईसह अन्य प्रमुख शैक्षणिक व संशोधन संस्थांमधून उदयास येणाऱ्या डीप टेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करेल. तो प्री-सीड आणि सीड टप्प्यांतील २५-३० स्टार्टअप्समध्ये, कमाल १५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून भारताच्या वाढत्या डीप टेक इकोसिस्टीमला मोठी चालना मिळणार आहे.
- प्रो. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com