फलाटावरील प्याऊंना गळती

फलाटावरील प्याऊंना गळती

Published on

फलाटावरील ‘प्याऊं’ना गळती
कांदिवली, प्रभादेवी रेल्वे स्‍थानकात प्रवाशांची गैरसोय
कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः रेल्वे फलाटावर विविध संस्थांच्या पुढाकाराने प्रवाशांची तहान भागवण्यासाठी ‘प्याऊ’ उभारण्यात आल्या आहेत. सध्या या ‘प्याऊं’कडे संस्थेचे तसेच रेल्वे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. कांदिवली फलाट दोन, तीन आणि प्रभादेवी रेल्‍वे स्‍थानकातील फलाट एक, दोनवर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ‘प्याऊ’च्या नळांना गळती लागली आहे.
पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपच्या जोडणीमधून पाणीगळती होत असल्याने फलाटावर पाणी पसरते. कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असून दुर्गंधी पसरते. त्‍यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने गळती थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
मुंबईत दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी कमलादेवी सराफ ट्रस्ट, लायन्स क्लब, रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यातून बहुतांशी फलाटांवर ‘प्याऊ’ उभारण्यात आले आहेत. कांदिवली फलाट दोन व तीनवर असलेल्या ‘प्याऊं’च्या बाजूलाच असलेली लोखंडी शिडी अडथळा निर्माण करत आहे. नळाला तसेच पाणी निचरा करणाऱ्या पाइपच्या जोडणीला गळती लागल्याने पाणी आजूबाजूला पसरत आहे. त्‍यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रभादेवी फलाटावरील ‘प्याऊ’च्या नळाला गळती लागली आहे. बाजूलाच तुटलेल्या लादीवर सिमेंट ठोकळा ठेवण्यात आला आहे. घाईगडबडीत असणारे प्रवासी या ठिकाणी अडखळतात. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून ‘प्याऊ’ची गळती थांबवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता होऊ शकला नाही.

मध्यमवर्गीय प्रवासी ‘प्याऊ’चा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कांदिवली- प्रभादेवीदरम्यान प्रवास केला असता दोन्हीही स्‍थानकांवरील ‘प्याऊं’ना गळती लागली आहे. गळती थांबवावी आणि ‘प्याऊ’ परिसरातील अडचणी दूर कराव्यात. निदान आम्हा ज्‍येष्ठ नागरिकांचा रेल्वे प्रशासनाने विचार करावा.
- विक्रम वंडेकर, ज्‍येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com