मशिदींवर प्रार्थनेच्यावेळी भोंगा लावण्याची परवानगी द्या
मशिदींवरील भोंग्यासाठी परवानगीची मागणी
२४ विविध मशिदींच्या वतीने सेवाभावी संस्थेकडून उच्च न्यायालयात याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः दिवसातून पाच वेळा प्रार्थनेसाठी (अजान) मशिदींवर भोंगा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन यासंदर्भात उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने आधीच काही नियमावली तयार केली आहे. त्याचा अभ्यास करण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी (ता. ९) याचिकाकर्त्यांना दिले.
ध्वनी पातळीचे नियम पालन करून लाउडस्पीकरवर अजान म्हणण्याची परवानगी देण्याची विनंती हजरत ख्वाजा गरीब नवाज कल्याण संघटनेच्या वतीने जनहित याचिकेमार्फत करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उपरोक्त आदेश दिले. मशिदीत अजानसाठी दिवसातून पाच वेळा लाउडस्पीकरचा वापर केला जातो; परंतु तो फक्त तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळेसाठी असतो. अजान म्हणजे मशिदीत नमाज पठण करणे. हा मुस्लिम समुदायाचा धार्मिक आणि श्रद्धेचा भाग असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. सकाळी, सायंकाळी किंवा दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी सुमारे चार मिनिटांपेक्षा कमी वेळेत लाउडस्पीकरद्वारे अजान देणारा मानवी आवाज ध्वनिप्रदूषण कसे निर्माण करू शकतो? त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचे आरोग्य कसे धोक्यात येते? सर्व ध्वनी लहरींना ध्वनिप्रदूषण म्हणता येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ६५ डेसिबल (डीबी) जास्त आवाजाला ध्वनी प्रदूषण म्हणून परिभाषित केले आहे. अजानसाठी ढोल, डीजे, साउंड ॲम्प्लिफायर इत्यादी वाद्ये वापरली जात नाहीत. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ठरावीक वेळी लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्याची मागणी याचिकेत केली आहे.
माहीम दर्ग्यामध्ये रात्री १०पर्यंतच कव्वालीला परवानगी
माहीम येथील प्रसिद्ध बाबा मखदूम अली दर्गा येथे अनुक्रमे १० आणि ११ डिसेंबरला कव्वालीला रात्री १२ वाजेपर्यंत वाढीव दोन तासांचा अवधी देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंगळवारी (ता. ९) फेटाळून लावली. दर्गा किंवा त्याच्या आवारात असे कार्यक्रम करण्याची परवानगी नियमबाह्य असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

