संकटकाळात अपघातग्रस्त वाऱ्यावर
संकटकाळात अपघातग्रस्त वाऱ्यावर
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ट्रामा केअर रखडले
मनोर, ता. ११ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांमध्ये गंभीर प्रवाशांवरील उपचारांसाठी दोनशे खाटांचे सामान्य रुग्णालय, २० खाटांचे ट्रामा केअर रुग्णालय उभारण्यात येणार होते, पण सहा वर्षांपासून रुग्णालय रखडल्याने जखमींना उपचारासाठी मुंबई, गुजरात किंवा केंद्र शासित प्रदेश सिल्वासा येथे न्यावे लागते. त्यामुळे संकटकाळात अपघातग्रस्त वाऱ्यावरच असल्याचे चित्र आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालयाला २०१७ मध्ये श्रेणीवर्धन करून दोनशे खाटांचे सामान्य, २० खाटांचे ट्रामा सेंटर उभारण्यासाठी ७६ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रियेनंतर २०१९ मध्ये रुग्णालयाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत टेन ग्रामपंचायत हद्दीतील टाकवहाल गावच्या हद्दीत शासकीय जागा निश्चित झाली. सध्या रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. इमारती व्यतिरिक्त रुग्णांसाठी खाटा, ऑक्सिजन वाहिनी, फर्निचर,विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणेच्या कामांचा समावेश नव्हता. त्यामुळे सुधारित मान्यतेनुसार १२० कोटींच्या मान्यतेत मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, परंतु कामे सुरू होण्यासाठी उशीर झाला. दरम्यान, नवीन वर्षातील मार्चपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून इमारती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन केले केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.
-------------------------------------------------
निधीच्या अडचणीचा फटका
- आदिवासीबहुल जिल्हा निर्माण होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु जिल्ह्यात आरोग्य, दळणवळण, नागरी सुविधांचा विकास दृष्टिपथात नाही. जिल्हा निर्मितीनंतरही आरोग्य सुविधांच्या बाबतीत मुंबईला लागून असताना पालघर जिल्हा मागासलेलाच आहे. आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन, राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात निधीच्या अडचणींमुळे रुग्णालयाचे काम संथ गतीने सुरू होते, परंतु त्यानंतरही कामांची संथ गती कायम होती. केंद्र सरकारच्या जनजाती विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
-----------------------------------
कामाची सद्यःस्थिती
बांधकाम ९० टक्के पूर्ण
विद्युतीकरण ६० ते ७० टक्के पूर्ण
उद्वाहिका उभारणी अंतिम टप्प्यात
-------------------------------
एकूण खर्च - १२० कोटी
विद्युतीकरण - २८ कोटी
फर्निचर, ऑक्सिजन प्लांट - ८ कोटी ९६ लाख
बांधकामासाठी - १० कोटी
झालेला खर्च - ६६ कोटी
अंदाजित खर्च - ५४ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

