हुल्लडबाज तरुणांची पळता भुई

हुल्लडबाज तरुणांची पळता भुई

Published on

हुल्लडबाज तरुणांची पळता भुई थोडी
पनवेल पोलिसांची वडाळे परिसरात कारवाई
पनवेल, ता. १० (बातमीदार) ः व्ही. के. हायस्कूल परिसरात वडाळे तलाव येथे दुचाकींवर गोंधळ, हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी शहरातील शांतता भंग करणाऱ्यांविरोधात अशी कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले.
वडाळे तलाव परिसरात तरुण दुचाकी, चारचाकी घेऊन स्टंट, वेगाने वाहन चालवणे, मोठ्या आवाजात गोंधळ करणे, अशा प्रकारची हुल्लडबाजी करत असल्याची तक्रार शालेय विद्यार्थ्यांपासून परिसरातील नागरिकांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली होती. तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी प्रकारांबाबत पोलिसांकडे लक्ष वेधले होते. याच अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी (ता. १०) सकाळी धडक मोहीम राबवली. या वेळी पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे तरुणांची पळता भुई थोडी झाली.
-----------------------
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई योग्य असल्याचे नमूद केले. तर अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com