मुंबई
मिरची गल्लीतील इमारतीला आग
मिरची गल्लीतील इमारतीला आग
पनवेल, ता. १० (बातमीदार) ः शहरातील मिरची गल्ली येथील अर्थवट बांधकाम असलेल्या इमारतीला बुधवारी (ता. १०) दुपारी आग लागली होती. पनवेल अग्निशामक दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.
मिरची गल्लीच्या प्रवेशद्वाराजवळील आर्किड क्लिनिकच्या बाजूला असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील गवत, प्लॅस्टिकने पेट घेतला. याबाबत परिसरातील जागरूक नागरिकांना माहिती मिळताच आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तत्काळ पनवेल अग्निशामक दलाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असते तर परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.

