चंद्रनगरच्या ३०० विद्यार्थिनींना सायकल वाटप

चंद्रनगरच्या ३०० विद्यार्थिनींना सायकल वाटप

Published on

तारापूर अणुशक्ती केंद्राकडून चंद्रनगरच्या ३०० विद्यार्थिनींना सायकलवाटप
कासा, ता. १० (बातमीदार) : तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सामाजिक जबाबदारी कक्षाने (सीएसआर) भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. जिल्हा परिषद शाळा, वनई चंद्रनगर येथे बुधवारी (ता. १०) सायकलवाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या एकूण २६ जिल्हा परिषद शाळांमधील ३०० मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात येणारा प्रवासाचा अडथळा दूर करणे आणि ‘नारीशक्ती’ला प्रोत्साहन देणे, हा उपक्रमावा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले तारापूर अणुशक्ती केंद्राचे संचालक अजयकुमार भोले यांनी हा उपक्रम नारीशक्ती बळकटीकरण आणि शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी पुढील वर्षी मुलांनाही सायकली देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला अजयकुमार भोले यांच्यासह चिरंजीब सहा, मूर्ती सर, प्रवूपद दास, तसेच बीएआरसी, तारापूरचे जनसंपर्क अधिकारी अमित देशपांडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय राजपूत, कायदेविषयक तज्ज्ञ ॲड. विराज गडग आणि मुख्याध्यापक सुभाष जाधव, शैलेश राऊत, भूषण ठाकूर आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com