मुरबाडमध्ये क्रीडा स्पर्धांचा थरार

मुरबाडमध्ये क्रीडा स्पर्धांचा थरार

Published on

टोकावडे, ता. १० (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील देवगाव केंद्रातील वार्षिक विविध गुणदर्शन स्पर्धा देवराळवाडी शाळेत मोठ्या उत्साहात पार पडल्या. एकूण १२ शाळांनी सहभाग नोंदवला. यंदाही देवगाव शाळेने आपली परंपरा कायम ठेवत बहुतेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. स्पर्धांसाठी केंद्रप्रमुख किरण गोरले, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी मंडप, स्टेज, ध्वनिव्यवस्था आणि सर्व विद्यार्थी-शिक्षकांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था केली. सूत्रसंचालन अरुण गोडांबे यांनी केले. देवगाव शाळेच्या मुख्याध्यापिका दीपश्री इसामे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तर दिलीप इसामे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे आणि ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे स्पर्धांचा दिवस संस्मरणीय ठरला.

स्पर्धांचे निकाल
समूहनृत्य : टाकीचीवाडी शाळा (प्रथम)
वक्तृत्व (लहान गट) : फणसोली शाळा (प्रथम)
नाट्यस्पर्धा : देवगाव शाळा (प्रथम)
समूहगीत (मोठा गट) : देवगाव शाळा (प्रथम)
समूहगीत (लहान गट) : देवगाव शाळा (प्रथम)
वक्तृत्व (मोठा गट) : देवगाव प्रशाळा (प्रथम)
शैक्षणिक साहित्य स्पर्धा : देवगाव शाळा (प्रथम)

मुरबाड : देवगाव केंद्रातील वार्षिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले.

भुवन शाळेच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत चमक
मुरबाड, ता. ९ (वार्ताहर) : २०२५च्या शालेय क्रीडा स्पर्धेत सरळगाव विभाग हायस्कूल येथे पार पडलेल्या शैक्षणिक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भुवन येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य सादर केले. अनेक स्पर्धांत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदावर आपली छाप उमटवली.
सरळगाव शैक्षणिक तालुक्यातील भुवन, माल्हेड, नागाव, संगम आणि वडवली या पाच केंद्रांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धेत लहान व मोठ्या गटातील एकूण १६ क्रीडा प्रकारांचे सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेत संगम केंद्रातील जि. प. शाळा संगम आणि भुवन केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुवन यांनी विशेष वर्चस्व राखत उत्तुंग यश मिळवले. भुवन केंद्राने केंद्रस्तरीय स्पर्धेत १६पैकी ११ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती करत तालुकास्तरावरही पाच क्रीडा प्रकारांत प्रथम, तर तीन क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावला. भुवन शाळेचे क्रीडा शिक्षक दिलीप खाटेघरे गुरुजी; तसेच सहकारी शिक्षिका जयश्री शेलवले, रेखा पाटील आणि रंजना डोहळे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. सर्व खेळाडूंनी उत्तम खेळाचे कौशल्य दाखवले असून, विशेषतः लंगडी मुलींच्या संघाने दिलेल्या अप्रतिम खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल भुवन ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.

मुरबाड : शैक्षणिक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भुवन शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

म्हसा विद्यालयात क्रीडा महोत्सव
मुरबाड, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, म्हसा येथे ८ व ९ डिसेंबरला शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. प्राचार्य आनंद जाधव यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानाला प्रदक्षिणा घालत महोत्सवाला सुरुवात केली. मातीशी असलेले नाते आयुष्यभर साथ देते. मातीत खेळणारा खेळाडू बलवान बनतो. आपल्या मातीशी आणि खेळाशी इमान ठेवा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पहिल्या दिवशी १०० मीटर, २०० मीटर, तीन कि.मी. (मुलींसाठी), पाच कि.मी. (मुलांसाठी) धावण्याच्या स्पर्धा; तसेच लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, लंगडी आणि दोरी उडी अशा वैयक्तिक स्पर्धा झाल्या. दुसऱ्या दिवशी डॉजबॉल, कबड्डी आणि खो-खो अशा सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावरील क्रीडा प्रशिक्षक स्वप्नील गायकर, साहिल पवार, गणेश कापडी, पंकज दळवी, अस्मिता नलावाडे आणि प्रतीक गायकर यांनी पंच म्हणून कार्यभार सांभाळत काटेकोर नियमांचे पालन केले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवासाठी महेंद्र बेद्रे, महेंद्र पष्टे, प्रा. जगन्नाथ कथोरे, रंजितसिंग कच्छावा, प्रा. निपुरते, शालिनी चौधरी, धनश्री साबळे, सुरेखा कराळे आणि करोटे यांनी मोलाचे सहकार्य केले. रमा पष्टे, प्रशांत परते आणि श्रीकांत दुघाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातारम’च्या वंदनाने करण्यात आली.

मुरबाड : म्हसा विद्यालयात क्रीडा महोत्सवाची सुरुवात करताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com