भाजप, बविआला एमआयएमची टक्कर

भाजप, बविआला एमआयएमची टक्कर

Published on

भाजप, बविआला एमआयएमची टक्कर
वसई-विरारच्या राजकारणातील प्रवेशाने चुरस वाढणार
संदीप पंडित ः सकाळ वृत्तेसवा
विरार, ता. ११ ः वसईच्या राजकारणात बविआ विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असा सामना रंगत होता; मात्र राजकीय उलथापालथीनंतर महाविकास आघाडी, महायुती, बविआ अशी लढत रंगली होती. आता प्रथमच वसई-विरारच्या राजकारणात एमआयएमने प्रवेश केल्याने चुरस वाढणार आहे.
बहुजन विकास आघाडीचा आधारस्तंभ असलेल्या वसई गाव, सोपारा, वसई फाटा आणि पेल्हार भागात मुस्लिम मते आहेत. अशातच एमआयएमचा राजकीय प्रवेश हा बविआबरोबर हिंदुत्वाच्या आधारावर मजबूत झालेल्या भाजपला धक्का देऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. एमआयएमच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमुळे वसईचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. तसा इशारा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वसईत दिला आहे.
‘मुस्लिम समाज आता कुणाच्या सतरंज्या उचलणार नाही, कुणाच्याही लग्नात नाचणार नाही. आम्ही आमची ताकद उभी करू,’ हे विधान केवळ स्थनिक राजकारणाला लक्ष्य करत नाही, तर मुस्लिमांच्या व्होटबँकेला एक स्वतंत्र ओळख देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे एमआयएमच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होणार आहेत.
---------------------------------------
राजकीय शक्यता
- एमआयएमच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारण मतांचे ध्रुवीकरण होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते, अशी भीती स्थानिक भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. जर एमआयएमने थेट आणि तीव्र हिंदुत्ववादी विरोधकांना लक्ष्य केले, तर त्याचा दबाव पारंपरिक मतांवर पडतो. एकत्र येणारा हिंदू मतदार एमआयएमच्या अतिआक्रमकतेमुळे दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला एमआयएमच्या आक्रमकतेला शह देण्यासाठी तेवढीच ताकद लावावी लागेल. वसई-विरारमध्ये भाजपचा स्थानिक आधार बविआच्या तुलनेत कमकुवत असल्याने एमआयएम मोठे आव्हान निर्माण करू शकते. यामुळे वसईतील निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या गडाला सुरुंग लावला जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com