वाळू तस्करांना दणका
वाळू तस्करांना दणका
डहाणू किनाऱ्यावर महसूल विभागाची कारवाई
कासा, ता. ११ (बातमीदार)ः तालुक्यातील नरपड, चिंचणी परिसरात सुरू बेकायदा वाळू तस्करीवर महसूल विभागाने बुधवारी पहाटे कारवाई केली. या वेळी विनावाहन क्रमांकाची चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
आगर, नरपड, चिंचणी आणि चिखले परिसरात बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. पहाटे चार वाजल्यापासून पथकाने सापळा रचला होता. या वेळी नरपड समुद्रकिनाऱ्यावर कारवाई राबवली. वाहनमालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. प्रांत अधिकारी विशाल खत्री आणि तहसीलदार सुनील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रेमनाथ बिराजदार, तलाठी हितेश राऊत आणि तलाठी संजय चुरी यांच्या पथकाने कारवाई केली.
ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ-------------------------------------
डहाणू किनाऱ्यावर वाळू चोरी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी आणि कर्मचारी यांचे पथक नेमले आहे.
- सुनील कोळी, तहसीलदार, डहाणू

