मुंबई
विज्ञान प्रदर्शनात १२४ प्रकल्प
विज्ञान प्रदर्शनात १२४ प्रकल्प
कासा (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील सेवा विद्यामंदिर आदिवासी हायस्कूल, गांगणगाव ५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात माध्यमिक विभागातील २७, प्राथमिक विभागातील ७६, दिव्यांग विद्यार्थ्यांचे तीन, शिक्षक साहित्य विभागातील सहा आणि प्रयोगशाळा परिचरांचे दोन असे ११४ प्रकल्प मांडण्यात आले आहेत. या उपक्रमात ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी’ शाश्वत शेती, हरित ऊर्जा, दळणवळण, आरोग्य, कृषी अशा विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांनी केले. विज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी प्रदर्शनाचे महत्त्व आहे.

