आयआयटी कॅम्पसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
आयआयटी कॅम्पसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज अनावरण
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा पवई येथील आयआयटी कॅम्पसच्या मुख्य इमारतीमध्ये उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी (ता. १२) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आयआयटीमधील एससीएसटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कॅम्पसच्या मुख्य इमारतीत तळमजल्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुंबई आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष वि. केदारे, उपसंचालक प्रा. मिलिंद आत्रे, उपसंचालक रवींद्र गुडी, प्रा. नंद किशोर, प्रा. के. व्ही. कृष्णराव, रजिस्ट्रार गणेश बोरखडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

