मुंबई
चंद्रकांत गोरीवले यांची घरवापसी
चंद्रकांत गोरीवले यांची घरवापसी
विरार (बातमीदार) ः नालासोपाऱ्यातील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक चंद्रकांत गोरीवले यांनी बविआला सोडचिठ्ठी देताना भाजपमध्ये घरवापसी केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे १० वर्षांपासून प्रभागात काम करणाऱ्या इच्छुकांपुढे नवे आव्हान उभे राहणार आहे. नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चंद्रकांत गोरीवले यांनी पक्षप्रवेश केला. या वेळी नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक उपस्थित होते.

