सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

Published on

सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था
पर्यटकांचा रोष तीव्र, उद्यान तातडीने दुरुस्त करण्याची सिडकोकडे मागणी
खारघर, ता. ११ (बातमीदार) : सिडकोच्या खारघरमधील सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असून, विशेषतः चिल्ड्रन पार्कमधील खेळणी पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. नाताळच्या सुट्ट्या अवघ्या काही दिवसांवर असताना लहान मुलांची मोठी वर्दळ अपेक्षित आहे, मात्र मोडकळीस आलेल्या खेळण्यांमुळे मुलांचा विरंगुळा हरपला असून, पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानातील खेळणी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
सिडकोने लंडनमधील हाइड पार्कच्या धर्तीवर खारघरमध्ये सेंट्रल पार्क उद्यान उभारले आहे. उद्यानात भारतीय संस्कृतीची ओळख होईल, अशाप्रकारे उद्यानाची रचना केली होती. उद्यानाच्या सुरुवातीलाच पखवाज, पेटी व इतर वाद्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. तसेच कारंजे बसविण्यात आले होते. भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम् व इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी अशाप्रकारचे थीम पार्क तयार केले होते, तर एका बाजूला चिल्ड्रन पार्क उभारून विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करून दिली होती, मात्र गेल्या पाच वर्षांत सिडकोने सेंट्रल पार्ककडे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण सेंट्रल पार्कची दुरवस्था झाली आहे. चिल्ड्रन पार्कमधील खेळणी मोडकळीस आली आहेत. त्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडत असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. सिडको प्रशासनाने चिल्ड्रन पार्कमधील खेळणी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे . यासंदर्भात सिडको अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, सेंट्रल पार्क विकसित केला जाणार असून, लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
यासंदर्भात विचारणा केली असता सिडको अधिकाऱ्यांनी, ‘सेंट्रल पार्कचा संपूर्ण विकास करण्याची प्रक्रिया सुरू असून, दुरुस्ती व नव्या सुविधांसाठी लवकरच निविदा काढण्यात येतील,’ असे सांगितले.
चौकट :
उद्यानातील समस्या
- उद्यानातील गेल्या २० वर्षांत एकही फूडकोर्ट सुरू होऊ शकले नाही.
- तलावातील आणि उद्यानातील कारंजे पूर्णपणे बंद असून, पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढली आहे.
- ढोलकी, तबला, पखवाज यांसारख्या वाद्यांच्या प्रतिकृतींची तोडफोड झाली आहे.
- नृत्यकलेची माहिती देणारे कलाकारांचे पुतळे गायब झाले आहेत.
- अँपी थिएटरचीही दुर्दशा झाल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ते अनुपयोगी ठरते आहे.

कोट :
‘सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत चिल्ड्रन पार्कमध्ये आलो असता सर्व खेळणी तुटल्याने मुलांना खेळताच आले नाही आणि माघारी फिरावे लागले. सेंट्रल पार्कच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असूनही स्थिती बिकट आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.’
- गणेश बनकर, रहिवासी, स्पॅगेटी सोसायटी, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com