भंगारातून शासकीय तिजोरीत आवरतली धनलक्ष्मी

भंगारातून शासकीय तिजोरीत आवरतली धनलक्ष्मी

Published on

भंगारातून शासकीय तिजोरीत अवरतली धनलक्ष्मी
५६५ पोलिस गाड्यांच्या लिलावातून पावणेदोन कोटी जमा
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : वर्षभरात ठाणे शहर पोलिस दलातील ५६५ कालमर्यादा संपुष्टात आलेल्या पोलिस गाड्यांचा लिलाव यशस्वी पार पडला आहे. त्या गाड्यांच्या लिलावातून शासकीय तिजोरीत अक्षरशः धनलक्ष्मी अवतरल्याचे दिसत आहे. या लिलावामुळे सरकारकडे पावणेदोन कोटींहून अधिक रुपये जमा झालेले आहेत, तर येत्या आठवड्यात आणखी २१ गाड्यांचा लिलाव होणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस दलातील मोटार परिवहन विभागाने दिली.
प्रत्येक वाहनाची एक विशिष्ट कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही कालमर्यादा साधारणपणे १५ वर्षे असते. त्यानंतर त्या गाड्या भंगारात निकाली काढल्या जातात. अशाप्रकारे पोलिस दलात दाखल झाल्यानंतर २०१६ पासून २०२३ या कालावधीत कालमर्यादा संपुष्टात आलेल्या गाड्यांचा लिलाव केंद्र सरकारच्या एमएसटीसीमार्फत ऑनलाइन करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी आतापर्यंत ५६५ गाड्यांचा लिलाव झाला असून, यामध्ये सर्वाधिक ३७८ मोटारसायकल आणि १९८ चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. नियमानुसार तीन ते चार वेळा पार पडलेल्या लिलावातून सरकारला त्या गाड्यांच्या लिलावपोटी एक कोटी ७६ लाख नऊ हजार ९५३ रुपये मिळाले आहेत. दरम्यान, या वर्षातील उर्वरित २१ गाड्यांचा पुढील आठवड्यात ऑनलाइन लिलाव आयोजित केला आहे.

दरवर्षी पोलिस दलात नवीन गाड्या दाखल होतात. त्याचप्रमाणे काही गाड्या दरवर्षी कालमर्यादा संपल्यानंतर भंगारात काढल्या जातात. अशा गाड्यांचा शासनाच्या नियमानुसार लिलाव होतो. त्यानुसार या वर्षभरात ५६५ गाड्यांचा लिलाव पूर्ण झाला असून, पुढील आठवड्यात २१ गाड्यांचा लिलाव होणार आहे.
- नासिर पठाण, सहाय्यक पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com