जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासह ''हब-एंड-स्पोक'' धोरण लागू करा

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासह ''हब-एंड-स्पोक'' धोरण लागू करा

Published on

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय करा ः खासदार नरेश म्हस्के
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शहरात ठाणे पालिकेचे एकमेव कळवा येथे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे. अशातच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येत असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आजही रुग्णांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबई गाठावी लागते. या ठिकाणी उपचारांसोबतच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची तातडीने आवश्यकता लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयात पीपीपी मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्यांच्या कर्करोग उपचारासाठी ‘हब-ॲण्ड-स्पोक’ धोरण लागू करण्याची मागणी गुरुवारी (ता. ११) संसदेत शून्य प्रहर काळात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. ३०० खाटांचे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने आणि काही इमारती मोडकळीस आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वास्तूचे नूतनीकरण करण्याचे ठरवून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे, परंतु येथील ओपीडीवर भार मोठ्या प्रमाणात असल्याने केवळ रुग्णालय बांधणे पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच या ठिकाणी उपचारांसोबतच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची तातडीने आवश्यकता आहे. ही सुपरस्पेशालिटी पायाभूत सुविधा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित राहू नये यासाठी सरकारने पीपीपी मॉडेल वापरून ते तत्काळ पूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरित करावे. यामुळे स्थानिक पातळीवर नवीन डॉक्टरांची निर्मिती तर होईलच, शिवाय मुंबईतील रुग्णालयांवरील वाढता ताणही कमी होईल, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली.

कर्करोग उपचारासाठी हब-ॲण्ड-स्पोकची मागणी
दरम्यान, आज जिल्हा पातळीवर कॅन्सरतज्ज्ञांची मोठी कमतरता आहे. जर आपण फक्त मशीन बसवल्या आणि डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत, तर ही संसाधने वाया जातील. केंद्र सरकारने कर्करोग रुग्णाच्या काळजीसाठी ‘हब-ॲण्ड-स्पोक’ मॉडेल अनिवार्य करावे. नवीन जिल्हा केंद्रांना टाटा मेमोरियलसारख्या मोठ्या कर्करोग संस्थांशी (हब) स्पोक म्हणून जोडणे आवश्यक आहे. यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पीपीपी व्यवस्थेद्वारे त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील देशातील सर्वोत्तम तज्ज्ञांकडून सल्लामसलत मिळून चांगले उपचार मिळतील, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com