पंचशील नगर झोपडपट्टीत भीषण आग

पंचशील नगर झोपडपट्टीत भीषण आग

Published on

‘व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरा’
मुरूड (बातमीदार) : विद्यार्थी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले. माध्यमिक विद्यालय काशिद येथे झालेल्या मुरूड तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रदर्शनात विविध प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आणि शिक्षक साहित्य स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, सरपंच राजश्री मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------
पंचशीलनगर झोपडपट्टीत भीषण आग
पनवेल (बातमीदार) : नवीन पनवेल पूर्वेकडील पंचशीलनगर झोपडपट्टीत उच्च दाब वीजवाहिनी तुटून आज गुरुवारी (ता. ११) दुपारी अचानक भीषण आग लागली. काही क्षणांत पसरलेल्या आगीत अनेक झोपड्या खाक झाल्या. घटनास्थळी पनवेल पोलिस, महावितरण आणि अग्निशमन दल तातडीने दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. उच्च दाब वीजवाहिनी तुटल्याने तीन किलोमीटर परिसरात वीजवाहिनी लोंबकळत असल्याचेही समोर आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पनवेल रेल्वे स्थानकाजवळील पार्किंगमधील अनेक दुचाकींचे नुकसान झाले, तर शाळा सुटण्याच्या वेळी ही घटना घडल्याने गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून नागरिकांनी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
-----------------------------------------------
खारघरमध्ये कोटीचा गुटखा नष्ट
खारघर (बातमीदार) : नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने जुलै महिन्यात भिवंडी आणि कामोठे येथून जप्त केलेला दोन कोटी ७२ लाखांचा अवैध गुटखा न्यायालयाच्या आदेशाने खारघर डोंगरात जाळून नष्ट केला. कामोठ्यात अडकलेल्या टेम्पोमधून मिळालेल्या माहितीवरून भिवंडी येथे छापा टाकून चार कंटेनर गुटखा जप्त करण्यात आला होता. पाच आरोपींना अटक झालेल्या या प्रकरणातील जप्त माल ओवे कॅम्प परिसरात खड्डा खोदून नष्ट करण्यात आला. पोलिस निरीक्षक सूरज गोरे आणि त्यांचे सहकारी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com