अखेर सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस निलंबित
सहाय्यक आयुक्त गोन्साल्वीस निलंबित
विरारमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेनंतर कारवाई
विरार, ता. १२ (बातमीदार) ः विरारमधील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेत १७ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या इमारतीविरोधात विहित मुदतीत कारवाई न केल्यामुळे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी ग्लिसन गोन्साल्वीस यांना निलंबित केले आहे. गुरुवारी (ता. ४) अटक झाल्यानंतर ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
विरार पूर्वेस विजयनगर परिसरात असलेली रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली अनधिकृत इमारत होती. यात ५० सदनिका होत्या; मात्र अवघ्या काही वर्षांतच ही इमारत जीर्ण झाली होती. विकसकाने इमारतीच्या रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवासी कर भरत होते. यावर आवश्यक कारवाई न झाल्यामुळे गोन्साल्वीस यांना आरोपीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
सेवानिवृत्तीपूर्वी कारवाई
विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ मध्ये त्यांची सेवानिवृत्ती होणार होती. तत्पूर्वीच घडलेल्या घटनेमुळे गोन्साल्वीस यांना कोठडीत बसावे लागले. या दुहेरी कारवाईमुळे वसई विरार शहर महापालिका कार्यालयात चर्चेचा विषय ठरला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतरही गोन्साल्वीस यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

