गोवेली येथे सिकलसेल सप्ताह व जनजागृती पंधरवड्याचे आयोजन

गोवेली येथे सिकलसेल सप्ताह व जनजागृती पंधरवड्याचे आयोजन

Published on

गोवेली येथे सिकलसेल सप्ताह व जनजागृती पंधरवड्याचे आयोजन
टिटवाळा, ता. १३ (वार्ताहर) : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कल्याण तालुक्यातील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गोवेली येथे सिकलसेल सप्ताह आणि जनजागृती पंधरवड्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला गरोदर मातांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, बाजार समितीचे सभापती रवींद्र घोंडविंदे आणि पत्रकार संजय कांबळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सिकलसेल हा लाल रक्तपेशींशी संबंधित गंभीर आजार असून वेळेवर तपासणी व उपचार आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. पूनम जयकर व कांचन पोल यांनी सिकलसेलबाबत सविस्तर माहिती दिली. या उपक्रमामुळे कल्याण तालुका सिकलसेलमुक्त होईल, असा विश्वास रवींद्र घोंडविंदे यांनी व्यक्त केला. या शिबिरात ५० हून अधिक महिला व मुलांची तपासणी करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com