डहाणू पं.स.च्या वार्षिक कामकाजाची तपासणी
डहाणू पं.स.च्या वार्षिक कामकाजाची तपासणी
कासा (बातमीदार) : डहाणू पंचायत समितीच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील वार्षिक कामकाज तपासणीचे टिप्पणी अहवाल वाचन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) इजाज अहमद शरीक मसलत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या तपासणीला गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी रेखा बनसोडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास वळवी यांच्यासह पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तपासणीदरम्यान पंचायत समितीअंतर्गत असलेल्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बांधकाम विभाग, ग्रापापु, लघुपाटबंधारे तसेच पीएमएवाय (प्रधानमंत्री आवास योजना) विभागातील प्रलंबित व अपूर्ण कामांच्या प्रगतीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच पीएमएवाय अंतर्गत मंजूर घरकुले निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

