कोकण फेस्टिव्हल–२०२५ ची उत्‍साहात सुरुवात

कोकण फेस्टिव्हल–२०२५ ची उत्‍साहात सुरुवात

Published on

कोकण फेस्टिव्हल २०२५ची उत्‍साहात सुरुवात
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : माणगाव येथे आयोजित कोकण फेस्टिव्हल २०२५चा उद्‌घाटन समारंभ शुक्रवार (ता. १२) सायंकाळी ७ वाजता ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या रोषणाईत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कोकणाच्या सांस्कृतिक, नाट्य व कलाविश्वाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला माणगावसह रायगड जिल्ह्यातील रसिकांची मोठी उपस्थिती लाभली.
या उद्‌घाटन सोहळ्यास सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक व ‘चला हवा येऊ द्या’फेम डॉ. नीलेश साबळे, माणगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे, ज्येष्ठ समाजसेवक संजय ऊर्फ अण्णा साबळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माणगावच्या सुप्रसिद्ध गायिका पूजा सोंडकर यांच्या लाइव्ह ऑर्केस्ट्राद्वारे सादर करण्यात आलेल्या भक्ती व भावगीतांनी झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणपती, नटराज, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. पुण्याहून आलेल्या फिरोज मुजावर यांच्या नृत्यगटाने गणेश वंदना व माउली गीतावर सादर केलेल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली. कोकणाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या माणगाव येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव १२ ते २२ डिसेंबरदरम्यान लोकशाहीर स्व. दादा कोंडके रंगमंचावर होणार आहे. पुढील दहा दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व नाट्यप्रयोग सादर होणार असल्याची माहिती प्रास्ताविकेतून डॉ. अजय मोरे यांनी दिली. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक चळवळ अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महाराष्ट्र व कोकणातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, महिला उद्योजिका तसेच ज्येष्ठ समाजसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com