श्रीवर्धन येथील सोमजादेवी रथोत्सवाला प्रतिसाद

श्रीवर्धन येथील सोमजादेवी रथोत्सवाला प्रतिसाद

Published on

श्रीवर्धन येथील सोमजादेवी रथोत्सवाला प्रतिसाद
श्रीवर्धन, ता. १३ (वार्ताहर) : श्रीवर्धन येथील जागृत ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सोमजादेवीचा वार्षिक रथोत्सव सोहळा शनिवारी (ता. १३) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. रथोत्सव दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी श्रीवर्धन व परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली होती. पारंपरिक पद्धतीने व धार्मिक विधींनी हा सोहळा पार पडल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंती साजरी झाल्यानंतर कृष्ण प्रतिपदेपासून देवीच्या सप्ताहास, म्हणजेच अखंड भजनांची सुरुवात करण्यात आली होती. शुक्रवार (ता. ५) पासून दिवसरात्र विविध समाजातील भजनी मंडळांकडून देवीच्या नामस्मरणात भजने, अभंग व कीर्तनांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहकाळात गावातील नागरिकांसह महिला, युवक व ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री सोमजादेवीचा रथोत्सव साजरा करण्याची परंपरा १८७७ सालापासून अखंडपणे सुरू असून, ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. भजन सप्ताह पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी मंदिर समितीच्या वतीने दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी देवीचा सप्ताह बसल्यानंतर प्रमुख विश्वस्त, मंदिर समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने महाप्रसादासाठी धान्य, आर्थिक मदत व साहित्य संकलन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभाग घेतला.
.......................
मध्यरात्री भाविकांची गर्दी
महाप्रसादानंतर मध्यरात्री देवीच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथोत्सवाच्या पूर्वसंध्येला देवीचा रथ आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. रथामध्ये देवीच्या मूर्तीची विधिवत स्थापना करून भरजरी वस्त्रे, दागदागिने व मौल्यवान सुवर्णालंकार परिधान करून श्री सोमजादेवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शुक्रवार (ता. १२) रोजी मध्यरात्री १२ वाजता सुरू झालेला रथोत्सव शनिवारी (ता. १३) दुपारी १२ वाजेपर्यंत चालू होता. रथ मंदिरात परतल्यानंतर देवीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर मानकरी, पंच समितीचे सदस्य, भजनी मंडळांचे प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com