विद्यार्थ्यांनी घेतला शेकोटीचा आनंद

विद्यार्थ्यांनी घेतला शेकोटीचा आनंद

Published on

विद्यार्थ्यांनी घेतला शेकोटीचा आनंद
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि आनंददायी शिक्षणाची सांगड घालत खास शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी माध्यम इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील ‘शेकोटी’ या पाठाचे कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कोटक फाउंडेशनचे प्रोग्राम लीडर सुमीत कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माध्यमिक विभाग मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे आणि इतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी या ‘आनंददायी शनिवार’मध्ये शेकोटीचा अनुभव घेतला. सहशिक्षिका आशा शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना शेकोटीचे महत्त्व सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com