मुलुंडला पक्षी उद्यान

मुलुंडला पक्षी उद्यान

Published on

मुलुंडला पक्षी उद्यान
मुख्यमंत्र्यांच्या हस्‍ते आज भूमिपूजन; १९० कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः मुलुंड येथे पक्षी उद्यान उभारण्यात येणार असून त्यासाठी मुंबई महापालिकेने १९० कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (ता. १४) या पक्षी उद्यानाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करणार आहेत.
अलीकडेच मुलुंड येथील या पक्षी उद्यानाच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. महापालिकेने १९० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. जागतिक दर्जाचे हे पक्षी उद्यान बनवण्यात येणार आहे. मुलुंड आणि पूर्व उपनगरांतील रहिवाशांसाठी एक नवे पर्यटनस्थळ या माध्यमातून मिळणार आहे. हे पक्षी उद्यान १७,९५८ चौरस मीटर जागेवर उभारले जाईल आणि भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे उपकेंद्र असेल.
११० वर्षांनंतर मुंबईला वैशिष्ट्यपूर्ण असे पक्षी उद्यान मिळणार आहे. ब्रिटिशांनी शंभर वर्षांपूर्वी भायखळ्यामध्ये प्राणिसंग्रहालय उभारले; स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच असे पक्षी उद्यान उभारले जाणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशीष शेलार आणि सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली.

या प्रकल्‍पाची आखणी अत्यंत बारकाईने करण्यात आली आहे. पूर्व उपनगरांतील जवळपास २५ लाख लोकसंख्या, तसेच नवी मुंबई आणि ठाण्याचे रहिवासी यांना याचा मोठा फायदा होणार आहे. हे पक्षी उद्यान मोठे पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येईल.
- मिहीर कोटेचा,
आमदार, भाजप


काय आहेत वैशिष्‍ट्ये
- १८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांसाठी प्रशस्त आणि नैसर्गिक अधिवास
- एशियन झोन, आफ्रिकन झोन, ऑस्ट्रेलियन झोन आणि अमेरिकन झोन अशा थीम
- पक्षीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आणि व्याख्याने
* पक्षी रुग्णालय, क्वारंटाईन विभाग, पक्ष्यांसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर आणि इतर अत्याधुनिक सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com