‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो’ला सुरुवात

‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो’ला सुरुवात

Published on

‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो’ला सुरुवात
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेंची हजेरी
वाशी, ता. १२ (बातमीदार) : क्रेडाई-बीएएनएमतर्फे आयोजित २४ वा ‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो-२०२५’ला वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली.
या कार्यक्रमाला पालिकेचे सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान, माजी अध्यक्ष वसंत भद्रा, उपाध्यक्ष ओमप्रकाश छाजेड, सेक्रेटरी जीगर त्रिवेदी, खजिनदार शैलेश पटेल, को-कन्वेनर महेश पटेल, हितेश गामी तसेच विविध पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातील निवासी, व्यावसायिक, टाउनशिप व लक्झरी प्रकल्पांचे सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात आले असून, २० लाख रुपयांपासून पुढील घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. १०० हून अधिक विकसकांचे ५०० पेक्षा जास्त प्रकल्प येथे मांडण्यात आले आहेत. विमानतळाच्या संकल्पनेवर आधारित स्टॉल्स हे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

बॉक्स :
नवी मुंबईत गुंतवणुकीच्या संधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, तळोजा-पनवेल रोड-वे व विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर यामुळे नवी मुंबई-पनवेल परिसर भविष्यातील गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. खारघरमधील प्रस्तावित हब व नैना प्रकल्पामुळे गृहखरेदीदार, गुंतवणूकदार आणि विकसकांसाठी हा परिसर अधिक फायदेशीर ठरेल.
रसिक चौहान, क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com