चार लेबर कोड विरोधात लढ्याची गरज

चार लेबर कोड विरोधात लढ्याची गरज

Published on

चार लेबर कोड विरोधात लढ्याची गरज
ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांचा हल्लाबोल

शिवडी, ता. १३ (बातमीदार) : भारतीय कामगार चळवळीच्या संघर्षातून निर्माण झालेले २९ कामगार कायद्यांचे चार लेबर कोडमध्ये रूपांतर केले आहे. हे कामगार कायदे मालकधार्जिणे व कामगारविरोधी असून, ते ताबडतोब मागे घेतले पाहिजेत. त्यासाठी सर्व उद्योगातील कामगारांनी शेतकऱ्यांप्रमाणे एकजुटीने लढा देणे, ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी इंदिरा गोदीतील जाहीर सभेमध्ये काढले. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील आऊटडोअर डॉक स्टाफतर्फे गुरुवारी संदीप घागरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. याप्रसंगी झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ॲड. एस. के. शेट्ये यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे कायम कामगारांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. ही गंभीर समस्या असून, आता भविष्यात कायम स्वरूपाच्या नोकऱ्या मिळणे फार कठीण आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी संप हे शेवटचे हत्यार आहे, परंतु संप करण्यासारखी कामगारांची सध्या मनस्थिती नसल्याचे सांगत ॲड. शेट्ये म्हणाले की, चार लेबर कोडमध्ये तर संपासारखे कामगारांचे शेवटचे हत्यारदेखील काढून घेतले आहे, मात्र सद्यस्थितीतदेखील गोदी कामगार सत्यनारायणाची महापूजा घालून कामगारांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करतात. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. त्या निमित्ताने सर्व कुटुंबांच्या भेटी-गाठी होतात, असे ॲड. शेट्ये म्हणाले.
याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सत्कार सोहळ्याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी डॉ. यतीन पटेल, दत्ता खेसे, विजय रणदिवे, मनीष पाटील, मारुती विश्वासराव, निसार मीर युनूस, मुंबई पोर्टचे अधिकारी, कार्यकर्ते, कामगार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन विजय सोमा सावंत व संदेश मोरे यांनी केले.


चार लेबर कोडबाबत कामगारांना जागृत करण्यासाठी लवकरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाईल. चार लेबर कोडबाबत सरकारने दाखविलेले प्रलोभन खोटे असून, भविष्यात कामगारांना नोकऱ्या मिळणार नाहीत. ठरावीक कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतील. चार लेबर कोड रद्द करण्याबाबत आम्ही कामगार संघटनांच्या वतीने नुकतेच मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. युनियनने आदेश दिल्यानंतर आपण सर्वांनी आंदोलनात उतरले पाहिजे. कामगारांना न्याय मिळविण्यासाठी संघर्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. कामगार एकजुटीच्या मार्गानेच लढा द्यावा लागेल.
- सुधाकर अपराज, सरचिटणीस, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com