ठाणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
अवैध लोखंडी सळई अपहारप्रकरणी पोलिसांची धडक कारवाई
दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त; १६ जणांवर गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे ता. १४ : अवैधरित्या लोखंडी सळईचा अपहार प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सुमारे दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये शहापूर येथील एका ढाबा मालकाचा सहभाग असून त्याच्यावरही कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. यावेळी २७ गॅस सिलिंडरही हस्तगतही केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहापूर विभागातील मौजे लाहेगाव येथील एकता ढाब्याजवळ छापा टाकण्यात आला. ढाबा मालक राघवेंद्र हरीपाल सिंग व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून ट्रेलरमधील लोखंडी सळईचा अपहार करून वाशिंद व पडघा परिसरात विक्री केल्याचे उघडकीस आले. या छाप्यात एक कोटी ३८ लाख ९० हजार ९८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात चार ट्रेलर आणि एक टेम्पो तसेच त्यामधील लोखंडी सळई व इतर वस्तू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच भारत पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधील गॅस अवैधरित्या सिलिंडरमध्ये भरल्याप्रकरणी स्वतंत्र कारवाई करत २७ गॅस सिलिंडर, गॅस टँकर व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी १६ जणांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

