वाहतूक विभागाला हव्यात क्रेन
वाहतुकीच्या कोंडीत ठाणे
वाहतूक पोलिसांची दिवसरात्र तारेवरची कसरत ः दोन हजार ०७९ वाहने हटवली
ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) ः अपूर्ण-अरुंद आणि खड्डेमय रस्ते, स्थनिक बेशिस्त वाहनचालक, रस्त्यात सुरू असलेली विविध विकासकामे या कारणांनी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला दिवसरात्र तारेवरची कसरत करावी लागत असून, त्यासाठी जेसीबी, हायड्रा क्रेन यांसारख्या यंत्रांची मदत घ्यावी लागते.
देशातील प्रमुख राज्यांना जोडणारे महत्त्वाचे मार्ग ठाण्यामधून जातात. त्यामुळे या मार्गांवर सतत जड-अवजड वाहनांसह इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. दुर्दैवाने ठाण्याला बायपास मार्ग नसल्याने ही वाहतूक शहरामधून होते. या मार्गांवर विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. यामुळे शहरातील रस्ते अरुंद आणि खड्डेमय होत असून, वाहतुकीला अनेक अडथळे येत आहेत. अशातच, या मार्गावर एखादे वाहन बंद पडले तरी वाहतूक कोंडी होत असते. अशा अवस्थेत वाहतूक विभागाला कोंडी नियंत्रित करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात वाहतूक विभागाने वर्षभरात रस्त्यात बंद पडलेली दोन हजार ०७९ जड-अवजड वाहने बाजूला सारून वाहतूक कोंडी दूर करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
रस्त्यांवरील संकटे :
खड्डे, मेट्रोची कामे, अरुंद रस्ते, नियमबाह्य गतिरोधके-दुभाजके, अनधिकृत कट, रस्त्यावर उतरविलेले मेट्रो स्थानकाचे जिने, अनधिकृत वाहन पार्किंग
अत्यावश्यक सेवेला अडथळे :
अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळे.
एमएसआरडीसी मदतीला :
वाहतूक शाखेकडे स्वतःची क्रेन सुविधा नसल्याने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून क्रेन मागवावी लागते.
ब्रेक डाऊनचे हॉटस्पॉट :
तीन हात नाका उड्डाणपूल, खारेगाव टोलनाक्यानजीकचा यू-टर्न, खारेगाव कट, गायमुख घाट, कोपरी टोलनाका ते कोपरी पूल, कॅडबरी उड्डाणपूल, नितीन जंक्शनची चढण, माजिवडा पुलावरील अवघड यू-टर्न, मुंबई-नाशिक-मुंबई मार्गावरील पूल आणि वाय जंक्शन, माणकोली ते पिंपळसर खिंड, कशेळी, काल्हेर पूल, पिंपळास ते ओवळी खिंड.
वाहतुकीसाठी निघण्यापूर्वी वाहनांची तपासणी, सक्षमतेबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. देखभाल-दुरुस्ती करण्यासह वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहू नये.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतबक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

