डहाणूतील जमीन घोटाळ्यात तलाठी, मंडळ अधिकारी निलंबित

डहाणूतील जमीन घोटाळ्यात तलाठी, मंडळ अधिकारी निलंबित

Published on

तलाठी, मंडळ अधिकारी निलंबित
डहाणूतील जमीन नोंदणीत गैरव्यहार प्रकरण
तारापुर, ता. १४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील बाडापोखरण येथील जमिनीच्या नोंदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या चार गुंठ्यांच्या जमिनीचे क्षेत्र परस्पर ४० गुंठे दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी तलाठी संतोष कोटनाके आणि मंडळ अधिकारी ज्योत्स्ना जमजाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे.
बाडापोखरण येथील गट क्रमांक ३८/४० ही जमीन जानकीबाई जैतू भंडारी यांच्या नावावर होती. या जमिनीचे मूळ क्षेत्र केवळ चार गुंठे होते, मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आलेल्या चुकीच्या व बेकायदेशीर फेरफारानंतर या जमिनीचे क्षेत्र थेट ४० गुंठे असल्याचे दाखवण्यात आले.
----
गैरफायदा
या फेरफारामागे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून राजेंद्र राऊत याने हा प्रकार केला. राजेंद्र राऊत याने जानकीबाई भंडारी यांच्या नावाशी आपल्या आजीचे नाव साधर्म्याने जुळत असल्याचा गैरफायदा घेत, तीच आपली आजी असल्याचे भासवणारी बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधारे स्वतःचे नाव वारस म्हणून सातबारा उताऱ्यावर चढवण्यात आले. याचदरम्यान, संबंधित जागेवर बोगस झाडे लागवड झाल्याच्या नोंदीही करण्यात आल्या, मात्र जमिनीच्या मूळ मालकांनी या फेरफाराला आक्षेप घेतल्यानंतर काही नोंदी मागे घेण्यात आल्या. तरीही गट क्रमांक ३८/४० वरील बेकायदेशीर फेरफार रद्द न झाल्याने हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार पुढे उघडकीस आला.

याप्रकरणी वाणगाव पोलिस ठाण्यात राजेंद्र राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेत तलाठी संतोष कोटनाके आणि मंडळ अधिकारी ज्योत्स्ना जमजाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. लाभार्थी व इतर सहभागी व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे महसूलमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com