सेवा रस्ते विलिनीकरणाला विरोध
सेवा रस्ते विलीनीकरणाला विरोध
माजी महापौर नरेश मणेर यांची प्रशासनावर टीका
ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) ः घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य रस्त्यात विलीन करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर माजी महापौर नरेश मणेरा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुस्थितीत असलेले सेवा रस्ते खोदून त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करून मुख्य मार्गात विलीन केले जात आहेत. यामुळे सेवा रस्त्यालगतच्या रहिवासी सोसायट्या, रुग्णालये आणि शोरूमधारकांना प्रचंड त्रास होणार असून, संतप्त झालेले रहिवासी अधिकाऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण करतील, असा इशारा मणेरा यांनी दिला आहे.
घोडबंदर हा महामार्ग रोज लाखो वाहनांची वाहतूक करतो आणि तो जेएनपीए (उरण) ते पालघर आणि गुजरात राज्याला जोडतो. त्यामुळे हा मार्ग अवजड वाहनांसह इतर वाहतुकीने कायम गजबजलेला असतो.
वाढत्या वाहनांसाठी मूळ मार्ग अपुरा पडत असल्याने रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मार्गावर दोन्ही बाजूंनी मेट्रो मार्गही तयार केला जात आहे. वाहतूक कोंडी कमी होणार नाही, असे वाटत असल्याने आता मार्गाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्ते मुख्य मार्गात विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कापूरबावडी पेट्रोल पंपापासून कासारवडवलीपर्यंत काही वर्षांपूर्वीच तयार केलेले डांबरी सेवा रस्ते आता सिमेंट काँक्रीटीकरण करून विलीन केले जात आहेत. सध्या कापूरबावडी पुलाजवळचा रस्ता उखडण्यात आला आहे. हा रस्ता आता कंपनी, शोरूम, रहिवासी सोसायट्या आणि पेट्रोल पंपाच्या अगदी जवळून मुख्य मार्गात विलीन होणार आहे. यामुळे ही ठिकाणे थेट मुख्य रस्त्याच्या जवळ आल्याने, त्यांच्या गेटमधून बाहेर ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
घोडबंदर मार्ग परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा विरोध डावलून प्रशासन सेवा रस्ते मुख्य मार्गात विलीन करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी शासनाकडून प्रशासनाला सर्व प्रकारचे बळ मिळत आहे. या रस्त्यावरून वाहने धावायला लागल्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील. त्या वेळी रहिवाशांच्या संतापाला वेगळे वळण लागलेले असेल, म्हणून आताच फसलेले नियोजन सुधरवणे आवश्यक आहे.
- नरेश मणेरा, मा. उपमहापौर, ठाणे महापालिका
फोटो ः कापूरबावडी पुलाजवळचा सेवा रस्ता खोदण्यात आला असून तो मुख्य मार्गात विलीन केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

