सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास
सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास
आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणिवा कळतात. त्यामुळे आणखी अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगले यश मिळते, असे मत आमदार संजय केळकर यांनी बारावी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना व्यक्त केले.
आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने सलग १३ व्या वर्षी १२ वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ७ डिसेंबरपासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी केळकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढविण्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लावण्यास आणि वेळेचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की आम्ही गेली १९ वर्षे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. यात कोचिंग क्लास संघटनेचादेखील सहभाग असतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळत असल्याचे केळकर यांनी या वेळी सांगितले.
सराव परीक्षा ७, १४, २१ आणि २८ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यम शाळा आणि दगडी शाळेजवळील महाराष्ट्र विद्यालय ही परीक्षा केंद्रे असून, या परीक्षेत दीड हजारहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. सराव परीक्षेचे निकाल व प्रमाणपत्र वितरण ४ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

