रायगडच्या शेतकऱ्यांसाठी किसान प्रदर्शन
रायगडच्या शेतकऱ्यांसाठी किसान प्रदर्शन
माणगाव, ता. १५ (वार्ताहर) ः पुणे जिल्ह्यातील मोशी येथे सुरू असलेले भारतातील सर्वात मोठे किसान प्रदर्शन हे केवळ कृषी साहित्याचे प्रदर्शन न राहता शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक व्यासपीठ ठरत आहे. १० ते १४ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात आलेल्या या भव्य कृषी प्रदर्शनातून पारंपरिक शेतीकडून आधुनिक, शाश्वत व उत्पन्नवाढीच्या शेतीकडे वाटचाल करण्याचा ठोस मार्ग शेतकऱ्यांना दाखविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष मार्गदर्शक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या प्रदर्शनाला माणगाव येथील स्वराज्य संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते पंकज तांबे यांनी भेट देऊन आधुनिक शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि प्रयोगांची सखोल माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवकल्पना, संशोधनाधारित शेतीपद्धती, तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. या किसान प्रदर्शनात आधुनिक शेती अवजारे, यांत्रिकीकरणासाठी आवश्यक उपकरणे, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, पाणी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारचे पंप, तसेच माती परीक्षणाच्या आधुनिक पद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवण्यासाठी कोणती साधने आणि तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकतात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व तज्ज्ञ मार्गदर्शन शेतकऱ्यांना येथे मिळत आहे.
.......................
शेतीपूरक उद्योगांमध्ये रस असणाऱ्या तरुण-तरुणींना छोट्या उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत लागणारी आधुनिक मशिनरी, नव्या तंत्रज्ञानातून विकसित यंत्रसामग्री प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे कृषी उद्योजकतेकडे वळू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरत आहे. या प्रदर्शनात विविध पिकांसाठी उपयुक्त सुधारित बियाणे, रोपे, ऊस वाटिका, गांडूळ खतनिर्मिती, शेततळ्यासाठी ताडपत्री, प्लॅस्टिक कल्चर, तसेच संरक्षित शेती (ग्रीनहाउस, शेडनेट) यांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, सोलार फवारणी यंत्रणा, सुधारित लागवड पद्धती यांवरही विशेष भर देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

