ठाण्यात नाताळनिमित्त बाजापेठांना बहर
ठाण्यात नाताळनिमित्त बाजापेठांना बहर
ख्रिस्तीबांधवांची खरेदीची लगबग
ठाणे, ता. १५ (बातमीदार) ः नाताळ सणानिमित्त ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ख्रिसमस ट्री, नाताळ तारा तसेच इतर रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यामुळे शहरातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. तर दुसरीकडे ख्रिस्तीबांधवांची सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे.
नाताळ अवघ्या काही दिवसांवर आला असून सर्व लहान मुलांना त्याचे वेध लागले आहेत. ठाण्यात ख्रिस्तीधर्मीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना येशू जन्मोत्सवाची आस लागली आहे. पारंपरिक वेशभूषा, खाद्यपदार्थ आणि संस्कृती जोपासत नाताळच्या खरेदीसाठी ख्रिस्तीबांधवांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. नाताळनिमित्त घर, चर्च, कार्यालय व गृहसंकुले सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीला वेग आला आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेले केक, विविध खाद्यपदार्थ, मित्रमैत्रिणी, नातेवाइकांना देण्यासाठी दुकानांत भेटवस्तू पाहावयास मिळत आहेत.
यंदा नाताळनिमित्त बाजारात ख्रिसमस ट्री, सांता टॉवर, सांताक्लॉज डोल, ख्रिसमस टोपी, स्नोमॅन, नाताळ तारा, रेनडीअर, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी, सांताक्लॉजचा पेहराव, विद्युत रोषणाईसाठीचे साहित्य, सुशोभित वेली, भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक भेटकागद, पिशव्या, भेटकार्ड अशा विविध प्रकारच्या साहित्याने बाजारपेठा बहरल्या आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही बाजारपेठांमधील वस्तूंचे भाव स्थिर असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती तसेच कार्यालयांच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचे होलसेल मार्केटचे विक्रेते अनुप यांनी सांगितले.
गोलाकार नाताळ हाराला मागणी
ख्रिसमस वेथ म्हणजे फुलांचा आणि पानांचा गोलाकार हार, जो येशूच्या जन्माच्या आनंदोत्सवाचे आणि अनंतकाळच्या जीवनाचे प्रतीक म्हणून वापरला जातो. याला नाताळचा हार असेही म्हटले जाते. नाताळ सणाच्या दिवसात दरवाजे तसेच घरांमध्ये लावण्यासाठी, सजावटीसाठी या हाराचा वापर केला जातो. यंदा बाजारात लहान-मोठ्या आकाराचे, ख्रिसमस बेल, लाल फिती, लायटिंग, फुले यांनी अशी सजावट केलेले प्लॅस्टिकचे तसेच कागदाचे नाताळ हार विक्रीसाठी ठेवले आहेत. तर १२० ते ६०० रुपयांपर्यंत त्यांची विक्री केली जात आहे.
नाताळ ताऱ्याला महत्त्व
ख्रिसमस नाताळच्या सणात नाताळ तारा हा महत्त्वाचा समजला जातो. नाताळचा आगमनकाळ सुरू झाल्यापासून नाताळ तारा लावण्यास सुरुवात होते. यंदा बाजारात विविध रंगीबेरंगी, विविध रंगछटा असलेले, पर्यावरणपूरक असे नाताळ तारे विक्रीला आले आहेत. १०० रुपयांपासून ते ५०० रुपयापर्यंतचे नाताळ तारे विक्रीसाठी ठेवले आहेत.
दरपत्रक
१. स्नो फ्लेक्स - ४०
२. स्टार तोरण - ३० ते १००
३. सांताक्लॉज डॉल - ३० ते १५०
४. मेरी ख्रिसमस स्टिकर - २० ते २००
५. ख्रिसमस बेल (लाल, सिल्वर, सोनेरी, चमकीवाली) - ५० ते २५०
६. स्नोमॅन - ३० ते १५०
७. गारलँड - २० ते २५०
८. गोलाकार नाताळ हार - १२०
९. लायटिंग बेल्ट - २० ते १००
१०. सांताक्लॉज टोपी - ५० ते २५०
११. सांताक्लॉज मस्क - ५० ते २५०
१२. येशू ख्रिस्त बर्थडे डेकोरेशन सेट - २००
१३. नाताळ तारा कंदील - ३० ते ५००
१४. ख्रिसमस ट्री फॅन्सी बोल - २५०
१५. व्हाईट रेनडीअर - २४०
१६. ख्रिसमस सांताक्लॉज टॉवर - २२०
१७. फोल्डिंग ख्रिसमस ट्री - ८००
१८. फॅन्सी ख्रिसमस ट्री - १,२०० ते ३,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

