आमदार राजेश मोरे यांनी मांडला विधानसभा अधिवेशनात प्रश्न

आमदार राजेश मोरे यांनी मांडला विधानसभा अधिवेशनात प्रश्न

Published on

टोरेंट पॉवरविरोधात राजेश मोरे विधानसभेत आक्रमक
ठेका रद्द, थकबाकी माफी व मृताच्या कुटुंबाला एक कोटी मदतीची मागणी
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी व दडपशाही कार्यवाहीवर कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. अतिरिक्त वीज वसूली, खोटे गुन्हे, दादागिरी आणि मृत्यू प्रकरणावर विधानसभेत मोरे यांनी प्रश्न निर्माण केला असून कंपनाचा ठेका रद्द करणे, थकबाकी माफी व पीडित कुटुंबाला एक कोटी रुपयांच्या मदतीची मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीत कल्याण ग्रामीण येथील नागरिकांवर टोरेंट पॉवर लिमिटेडकडून होत असलेल्या अन्यायकारक वीज वसूलीबाबत राजेश मोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. दातिवली, दिवा, साबे, बेतवडे, म्हातार्डी, आगसन, खरडी, शिल, पडगा, मोठी देसाई, देसाईचे पाच पाडे, पडले, खिडकाळी, डायघर, दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, वाकलण, बामर्ली, नारिवली, भाले, नागांव, उत्तरशिव गोठेकर, कर्मनगर, ठाकुर पाडा आणि इतर गावांमधील शेतकरी व नागरिकांवर टोरेंट पॉवर कंपनीकडून अतिरिक्त वीज वसूली, खोटे गुन्हे दाखल करणे, दादागिरी आणि दडपशाही स्वरूपाची मनमानीची कार्यवाही सुरू असल्याचे मोरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

२०२४ची वीज थकबाकी माफ करावी
या कारवाईमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त झाले असून, टोरेंट पॉवरचा ठेका तत्काळ रद्द करावा आणि २०२४ पर्यंतची वीज थकबाकी पूर्णतः माफ करण्यात यावी, शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, शेतजमिनीत पोल व ट्रान्सफॉर्मर टाकल्याबद्दल योग्य मोबदला देण्यात यावा, अशा ठोस मागण्याही मोरे यांनी विधानसभेत केल्या.

मृताच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत
यासोबतच दातिवली गावात विद्युत लाईनमुळे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाच्या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि मृताच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

सकारात्मक कार्यवाही करणार
या संपूर्ण विषयावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन विधानसभेत दिले असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com