किन्नूर सफरचंदाला हवामानाचा फटका
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : लालचुटूक, चवीला गोड आणि रसाळ असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नूर सफरचंदांच्या हंगामाला यंदा हवामानाचा चांगलाच फटका बसला आहे. डिसेंबरमध्ये आवक होणारी ही फळे अद्याप बाजारपेठेत आली नाहीत. या सफरचंदाला हवामानाचा फटका बसल्यामुळे सध्या परदेशी सफरचंदांना उठाव मिळत आहे. त्यांचे दरही वाढले आहेत. परिणामी ग्राहकांनी ही परदेशी सफरचंद ४०० ते ५०० रुपये किलो दराने किरकोळ बाजारात खरेदी करावी लागत आहेत.
परदेशी सफरचंदाप्रमाणे चकचकीत असलेली किन्नूर सफरचंदे ग्राहकांच्या पसंतीस उतरली जातात. भारत-चीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंदांची आवक होते. यावर्षी लांबलेला पावसाळा आणि त्याबरोबर अनेक ठिकाणी झालेली पूरसदृश परिस्थितीमुळे किन्नूर या भारतीय सफरचंदांना मोठा फटका बसला आहे. त्यांची बाजारातील आवक जवळजवळ ठप्पच झाली आहे. दरवेळी या हंगामात ही सफरचंद १५० ते १८० रुपये किलो असतात, मात्र या वेळी २५० रुपये किलो झाली आहेत. त्यामुळे बाजारातील सफरचंदाची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशी सफरचंदाची आयात केली जात आहे.
अमेरिका, न्यूझीलंडमधून आवक
भारतातून देशी, तसेच परदेशी सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतात. सध्या आपल्याकडे चीनमधून येणारी फुजी सफरचंदांना भारतीय बाजारपेठ बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अमेरिका, न्यूझीलंडमधून सफरचंदांची आवक वाढली आहे, मात्र मागणी जास्त असल्याने सध्या या परदेशी सफरचंदांना जास्त भाव आला आहे.
ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत हंगाम
ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत भारतीय सफरचंदाचा हंगाम असतो. या काळात बाजारात भारतीय सफरचंद इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की, परदेशी सफरचंद आयात करावी लागत नाही. या काळात देशी सफरचंदाचे दरही परदेशी सफरचंदाच्या मानाने बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असते. त्यामुळे परदेशी सफरचंदांची खरेदी केली जात नाही.
परदेशी फळांचे चढे दर
न्यूझीलंड क्वीन ॲपलचा १८ किलोंचा बॉक्स घाऊक बाजारात सहा हजार रुपये झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हे सफरचंद ३५० ते ४०० रुपये किलो झाला आहे. वॉशिंग्टन ॲपलचा २० किलोंचा बॉक्स घाऊक बाजारात पाच हजारांच्या पुढे आहे, तर किरकोळ बाजारात ही सफरचंद ३०० रुपये किलोंच्या घरात आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

