वर तक्रार नोंदवा.

वर तक्रार नोंदवा.

Published on

बेशिस्त रिक्षाचालकांना आरटीओ शिकवणार धडा
एका क्लिकवर नोंदवा तक्रार ः टोल-फ्री व व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिका हद्दीतील रिक्षा चालकांच्या मुजोरीने प्रवासी त्रस्त झाले असून, त्यांच्या विरोधात आता प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे. प्रवाशांशी असभ्य वर्तन करणे, भाडे नाकारणे आणि जादा पैसे उकळणे, अशा चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी प्रशासनाने विशेष टोल-फ्री क्रमांक आणि व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला आहे.
१८००२२०११० हा टोल-फ्री क्रमांक आणि ९००४६७०१४६ हा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला आहे.
महापालिका हद्दीतील पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर आणि खारघर रेल्वे स्थानकासह शहरी आणि ग्रामीण भागात बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी वाढत आहे. विशेषतः खारघर परिसरात रात्री १० नंतर रिक्षाचालकांची दादागिरी सुरू होते. मीटरप्रमाणे भाडे न स्वीकारणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे आणि प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. विनागणवेश, विना परवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या चालकांमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. याविरोधात आरटीओ प्रशासनाने विशेष १८००२२०११० हा टोल-फ्री क्रमांक आणि ९००४६७०१४६ हा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

तक्रार कशी करावी?
रिक्षा किंवा टॅक्सीचा नोंदणी क्रमांक, वेळ आणि ठिकाण, नेमकी तक्रार काय आहे याचा संक्षिप्त तपशील देणे आवश्यक आहे.

अशी होणार कारवाई
तक्रार प्राप्त होताच परिवहन विभागाकडून संबंधित वाहन चालकास नोटीस पाठवली जाईल. पहिल्या तक्रारीसाठी ११०० रुपये दंड,
दुसऱ्यासाठी २२०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसईमध्येही कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागाचा १८००-२२०-११० हा टोल फ्री क्रमांक मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई आणि पनवेलसाठी सामायिक आहे. मात्र, पनवेल उप प्रादेशिक परिवहन विभागाने स्थानिक तक्रारींसाठी ९००४६७०१४६ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com