प्रलंबित दावे सोडवण्यात ठाणे राज्यात प्रथम
प्रलंबित दावे सोडवण्यात ठाणे राज्यात प्रथम
५१,२२२ दाव्यांचा निकाल; ३० वर्षांची जुनी प्रकरणेही काढली निकाली
ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५१,२२२ प्रकरणांचा निपटारा करून विधी सेवा प्राधिकरण राज्यात प्रथम आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या लोकअदालतीला पक्षकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अदालतीमध्ये इतर प्रकरणांसोबतच ३० वर्षांपासूनची जुनी प्रलंबित प्रकरणेदेखील तडजोडीने निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या वर्षाची शेवटची राष्ट्रीय लोकअदालत पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी (ता. १३) पार पडली. या अदालतीत पक्षकाराने आपसात तडजोड करून प्रकरणे सोडवता यावीत याकरिता संधी देण्यात आली होती. त्यामध्ये पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले दावे सामोपचाराने सोडवून घेतले. या लोकअदालतीमुळे पक्षकारांचा पैसा आणि वेळ वाचलाच; परंतु न्यायालयाचा भारदेखील कमी होण्यास मदत झाली.
अत्यंत जुनी प्रकरणे निकाली
न्यायालयात अनेक जुने दावे न्यायासाठी प्रत्यक्षात असतात, मात्र न्याय मिळण्याऐवजी त्यांना वारंवार तारखेवर तारीख दिली जाते, मात्र आणखी दिवस जाण्याच्या भानगडीत न पडता ५३३ पक्षकारांनी आपसात समेट घडवून ५वर्षे, १० वर्षे, २० वर्षे व ३० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली जुनी प्रकरणे सोडवून घेतली.
अपघात ग्रस्तानानुसार भरपाई
विविध अपघाताची २५६ प्रकरणे लोकअदालतीत सोडवण्यात आली. पीडित आणि वारसांना एकूण २७ कोटी ०८ लाख ९५ हजार ६२० रुपयांची भरपाई देण्यात आली. डीआरटीची ७१ प्रकरणे निकाली काढून यामध्ये पक्षकारांना २४,५७,००,४६२ रुपये देण्याचा निकाल झाला.
वैवाहिक प्रकरणे
कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक प्रकरणांमधील वाद सामंजस्याने मिटविण्यात आले. एकूण ६७ प्रकरणांमध्ये यशस्वी समेट घडवून १६ जोडप्यांनी पुन्हा एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणातील १७४८ जुनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढून ३७,७५,६९,६९४ रकमेची तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाले. किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुली केलेल्या २४,३२४ कसुरवारांना न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून १,५७,१८,६३० दंड आकारून ही प्रकरणे निकाली काढली. प्राॅपर्टी टॅक्स,रेव्हेन्युची दाखलपूर्व ३९३९ प्रकरणे निकाली काढून ८,७१,६०,२२५ रुपयांची तडजोड केली. १०५ पॅनेल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण ३२८२७ प्रलंबित प्रकरणे व १८३९५ दावा दाखल पुर्व प्रकरणे असे एकूण ५१२२२ प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढले.
राष्ट्रीय लोकांना पक्षकांचा सहभाग वाढत आहे. असे दावे सोडवण्यात आणि जिल्हा परिषद अनेकदा राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे. या प्रकारच्या न्यायामध्ये वेळ पैसा वाचतो शिवाय पक्षकारांमध्ये आपसात कोणत्याही प्रकारचे मतभेद, वैर राहत नाही. प्रत्येक प्रत्येक वर्षात प्रत्येक तीन महिन्यांनी अशा प्रकारची अदालत भरत असून, पक्षकारांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे.
- न्या. रवींद्र एस. पाजणकर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे
फोटो : निकाल देणारे पॅनेल,
कोट फोटो : न्या. रवींद्र पाजणकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

