मुंबई
धोकादायक दुभाजकामुळे अपघाताची भीती
धोकादायक दुभाजकामुळे अपघाताची भीती
मालाड, ता. १५ ः मालाड मालवणी गेट क्रमांक ५ येथे जीर्ण दुभाजकामुळे अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे. मालवणी पोलिस ठाण्यासमोरील शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर हे दुभाजक आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. वेगाने आलेल्या वाहनावर हे दुभाजक कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पालिकेने तातडीने दुभाजकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

