राजकारणापलीकडे समाजकारण आणि नाती जपणारा कार्यकर्ता
राजकारणापलीकडे समाजकारण, नाती जपणारा कार्यकर्ता : हितेंद्र ठाकूर
सुभाष विश्वासराव यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा उत्साहात
विरार, ता. १५ (बातमीदार) : आजच्या काळात प्रामाणिक आणि निस्वार्थी कार्यकर्ते कमी होत असताना, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष विश्वासराव यांच्यासारखा कार्यकर्ता आपल्या कामातून राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करतो आणि नाती जपतो. हे गुण नव्या कार्यकर्त्यांनी आत्मसात करायला हवेत, असे प्रतिपादन वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले. विश्वासराव यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
वसई येथील वर्तक विद्यालयात हा ‘पंचार्ती’ सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या विश्वासराव यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी विशेषतः बेळगाव येथील सीमावादाच्या लढ्यात विश्वासराव यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या कामाची वेगळी ओळख सांगितली. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष भरत गुप्ता, माजी विरोधी पक्षनेता विनायक निकम, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत, राजेंद्र कांबळी, कुमार धुरी, भाजपचे शेखर धुरी, नितीन राऊत, संदेश जाधव तसेच विश्वासराव यांच्या भगिनी उपस्थित होत्या.
या वेळी केदार दिघे यांनी सांगितले की, दिघे साहेबांबरोबर काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्याचा सत्कार करणे, हे माझे भाग्य आहे. आजही त्यांच्यासारख्या लोकांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी असलेल्या अशा कार्यकर्त्यांमुळेच आज शिवसेना खंबीरपणे उभी आहे. कितीही संकटे आली तरी शिवसेना त्याला सामोरे जाऊन उभी राहते, असेही दिघे यांनी या वेळी स्पष्ट केले.
मान्यवरांनी या वेळी सुभाष विश्वासराव यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक संजय गुरव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम बाबर, शशिभूषण शर्मा, सुनील मुळे, जयराम राणे, एडविन, नरेंद्र पाटील, शशी करपे आदींनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

