इव्हीएमच्या सुरक्षेसाठी महिलांचा जागता पहारा
उरण, ता. १५ (वार्ताहर) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या आहेत. ३ डिसेंबरची मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार आहे. उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर इव्हीएममध्ये कोणताही प्रकारे फेरफार होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सुरक्षा कक्षाबाहेर जागता पहारा सुरू केला आहे. या घटनेत महिला नेतृत्व आणि त्यांचा उत्स्फूर्त सहभाग ठळकपणे समोर येत आहे. निष्पक्ष निवडणुकीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार उरण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
उरण नगरपरिषद कार्यालयातच निवडणुकीतील इव्हीएम कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र स्ट्रॉगरूम तयार करण्यात आली असून १० सशस्त्र पोलिस व अधिकारी, तसेच राज्य राखीव दलाचे पोलिस येथे पहारा देत आहेत. इव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार होऊ नये, यासाठी मविआच्या उमेदवार भावना घाणेकर यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी स्ट्रॉगरूमबाहेर जागता पहारा सुरू केला आहे. त्या रात्रभर तंबू ठोकून या ठिकाणी पहारा देत आहेत. त्यांच्यासोबत नगरसेविकापदाच्या उमेदवार नाहिदा ठाकूर, तसेच इतर उमेदवारही रात्रभर पहारा देत आहेत. रस्त्यावरच जेवण, तिथेच झोप आणि अहोरात्र पहारा असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.
लोकशाहीसाठी निर्धार
डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी, पाणी, चादरी-गाद्यांची व्यवस्था करून या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही सतर्कता कायम ठेवली आहे. या वेळी जागते रहो आणि रात्र वैऱ्याची असे नारे देत लोकशाहीच्या संरक्षणासाठीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूम परिसरात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, त्याद्वारे परिसर आणि स्ट्रॉगरूमवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. स्ट्रॉगरूमबाहेर सर्व बाजूंनी पुरेशी प्रकाशव्यवस्था केली आहे. तसेच एक अधिकारी नियमितपणे येथे येऊन स्ट्रॉगरूमच्या सीलची तपासणी करतो. मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी कोणतीही गडबड होऊ नये, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे.
- डॉ. उद्धव कदम, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

