शेरोशायरी स्पर्धेत सेंट जोसेफ महाविद्यालयाचा सिद्धांत खंदारे प्रथम
शेरोशायरी स्पर्धेत सेंट जोसेफ महाविद्यालयाचा सिद्धांत खंदारे प्रथम
विरार, ता. १५ (बातमीदार) : प्रगती महाविद्यालय, वसई यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाल विरार पश्चिम यांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या सिद्धांत खंदारे याने शेरोशायरी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एकल नृत्य विभागात सेंट जोसेफ महाविद्यालयाची यशस्वी मेहेर रजतपदकविजेती ठरली तर जोलंटा फर्गोस हिने कांस्यपदक पटकावले. सेंट जोसेफ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. जगदीश संसारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराव घोरुडे यांनी पारितोषिक विजेत्या कलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपप्राचार्य आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुभाष डिसोजा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ज्ञानदीप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही महाविद्यालयाची संपत्ती आहे, असे मत व्यक्त केले.

